“पुन्हा पुन्हा...”
तुझ्यासोबतीची आठवण येते मला,
जगतो मी तो क्षण पुन्हा पुन्हा...
सहवास होता तुझा मोहरलेला,
कडक उन्हांतही थंडावा देणारा,
सप्तरंग जणु डोळ्यात साठलेला,
तुझ्या स्फंदनांनी मोहून झुललेला,
म्हणून तुझ्यासोबतीची आठवण येते मला,
जगतो मी तो क्षण पुन्हा पुन्हा...
तुच माझी राणी असे जाणवले मजला,
जेव्हा प्रथम क्षणी पाहिले डोळ्यात तुझ्या,
पसरलेले शब्द हळुच आले ओठांवर,
लाजलेल्या तुझ्या डोळ्यांनी निखरले तू मला,
म्हणून तुझ्यासोबतीची
आठवण येते मला,
जगतो मी तो क्षण पुन्हा पुन्हा...
दोघांमधले अंतर आज खूप वाढले आहे,
तुझ्या माझ्या भेटीची तार तुटली आहे,
प्रेमाचा गंध जणुकाही घट्ट दाटला,
नशिबाचा खेळ सारा वा-यावर सोडला,
तरीसुद्धा तुझ्यासोबतीची आठवण येते मला,
जगतो मी तो क्षण पुन्हा पुन्हा...
No comments:
Post a Comment