“निखारा”
गर्द रात्री काळोखाने दिला एक इशारा,
निघालो
मी घेऊनिया तळहाती निखारा.
तप्त तांबडा गोळा आहे माझ्या या हाती,
अंधारलेल्या भुयारामध्ये कुणीच नाही साथी.
विस्फारलेल्या
बुबळांनी घालू साद कुणाला,
हाती आहे
विस्तव तरीही चटके बसे मनाला.
पायातुनि रक्त वाहे पसरलेले काटे,
धावू आता
कुणीकडे उजेड नाही कुठे.
तेवत आहे
ज्योत एकच ह्रदयामध्ये माझ्या,
दिशा दाखविल तीच आता भविष्यातली जागा.
No comments:
Post a Comment