“झुळुक”
झुळुक तू लाजणारी,
नको जाऊ माझ्यापासून,
फक्त होकार दे मजला,
चोरेन तुला तुझ्यापासुन.
मोकळ्या निर्जन रानामध्ये,
झोक्यावर मी बसतो,
शेजारी तू आहे समजून,
गालामध्ये हसतो.
झुणझुण या वा-यामध्ये,
हसणे तुझे हे दिसते,
पाहुन सारे गालामध्ये,
मलाही हास्य फुटते.
ह्रदय माझे भरलेले,
ओसांडुन वाहु लागते,
कुठे बांध घालु आता,
वाहणेच हवेसे वाटते.